अखेर पिता छत्रही हरपले

दापोली(प्रतिनिधी):- दापोली कोकण कृषी विद्यापीठातील अनिल मरकड यांच्या क्रेटा गाडीला ३० मे २०२६ रोजी मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे हॉटेल बालाजी नजीक उभ्या असलेल्या डंपरला धडक बसल्याने भीषण अपघात झाला होता.
ते आपले मूळ गाव नगर येथून दापोलीकडे सुट्टी संपून येत होते. या अपघातात अनिल मरकड हे गंभीर जखमी झाले होते तर या अपघातात त्यांची पत्नी आणि मुलगी यांचा मृत्यू झाला होता. मुलगा चिन्मय याच्या हाताला दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार करून तो बरा होत आहे.
हे सर्व कुटुंबीय ३० मे रोजी त्यांच्या नगर या मूळ गाववरून दापोली येथे घरी सुट्टी संपवून परत येत असता सायंकाळी चारच्या दरम्यान त्यांची कार समोरील कंटेनर खाली घुसून भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांची पत्नी सुवर्णा गव्हाणे माहेरचे नाव (स्टेट बँक ऑफ इंडिया येथे वरिष्ठ सहयोगी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.)आणि त्यांची मुलगी अनुश्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अनिल मरकड यांना गंभीर दुखापत झाली होती . त्यांना पुढील उपचाराकरता पनवेल येथे हरवण्यात आले होते.
मुलगा चिन्मय याच्या फक्त हाताला दुखापत झाली होती.
मात्र दुर्दैवाने ३० मे पासून अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या अनिल मरकड यांची आज ९ जून रोजी अखेर प्राणज्योत मालवली आहे.
यामुळे त्यांचा मुलगा चिन्मय याचे एकमेव वाचलेलं पितृ छत्र हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सद्यस्थितीत चिन्मय आजी आजोबांच्या छायेमध्ये गावी नगर येथे राहत आहे.
हे सर्व कुटुंबीय दापोली तालुक्यातील जालगाव येथील मंगलभूमी अपार्टमेंट येथे रहात होते. अनिल मरकड यांच्या निधनाच्या बातमीने मंगलभूमी अपार्टमेंट मधील सर्व सदस्यांसह परिसरातील नागरिक निःशब्द झाले आहेत.