गौरव पोंक्षे माखजन:
शाळेचा पाहिला दिवस प्रत्येकाला आठवला की प्रत्येकाच्या डोळ्या समोर येतात ते पावसाळी दिवस..जणू हिरवा गार निसर्गच विद्यार्थ्यांच्या स्वागताला उभा आहे की काय असच काहीस वाटत..शाळेचा पहिला दिवस म्हटला की, विद्यार्थ्यांच्या हातात छत्री किंवा अंगात रेनकोट हे चित्र स्वाभाविक पणे प्रत्येकाच्या मनात उमटत.पण हे वर्ष थोड अपवादात्मक पहायला मिळाल.यावर्षी विद्यार्थ्यांचा पाहिला दिवस चक्क,घामाच्या धारा,आणि डोक्यावर रणरणत ऊन यातच गेला.
शाळेचा पाहिला दिवस म्हणजे,शाळेला निघालं की हमखास पाऊस येणार हे समीकरणच जणू असायचं,रस्त्यातून जाताना डबक्यातील पाण्यात पाय घालत, छत्री गोल फिरवून त्यावरून ओघळणारे पाणी मित्रावर उडवत, मज्जा करत,थोड भिजत शाळेला पोहचणारी मूल आपण बघत आलो.आधीच पाऊस सुरु झालेला असल्याने सर्वत्र हिरवगार झालेल असत.बाहेर येऊन जाऊन पाऊस असल्याने शिक्षकांची आणि पालकांची ही लगबग पहायला मिळते.पण यावर्षी चक्क शाळा जून ऐवजी १५ मे लाच भरली की काय असा आभास होत आहे.कमालीचे,ऊन,अंगाची लाही लाही होईल असा उन्हाळा,आणि सगळीकडे रखरखाट,दरवर्षी पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पावसाच्या धारानी स्वागत होत असे.यावर्षी मात्र स्वागताला घामाच्या धारा!
दरवर्षी नव्याने शाळा सुरु झाल्यावर,माझा शाळेचा पाहिला दिवस या विषयावर निबंध लिहिताना,विद्यार्थ्यांच्या निबंधातून हिरवागार बहरलेला निसर्ग आणि भिजत भिजत शाळेत कसे पोहचलो,खड्यातील पाण्यात किती मजा केली,एकमेकाला किती भिजवलं हे सारच हद्दपार होणार.
निसर्गाच्या या चमत्कारिक बदलाचा वेगळा अनुभव विद्यार्थी,शिक्षक ,व पालकांना अनुभवायला मिळात आहे.विद्यार्थ्यांना मात्र असाच उन्हाळा चालू राहिला तर दिवसभर शाळेत थांबणे शाररिक दृष्ट्या खूप कठीण आहे.याकडे ही प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.












