सरपंच श्रीकृष्ण अनभवणे आंचे आयोजन
शाळेचा पहिला दिवस आणि नवगतांचे शाळेतील पहिले पाऊल आणि नवनविन चेहरे असा आनंदमय दिवस दभोळे गावात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी गावातील प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांना स्कूल बॅग व शालेस वस्तू देवून स्वागत केले.
माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळे उपक्रम राबवून साजरे करत आहे. या निमित्ताने दाभोळे सरपंच श्री.अनभवणे यांनी दाभोळे गावातील शालेय मुलांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कार्य तळरागाळातील मुलांपर्यत पोहाचावे या उध्देशाने आपल्या गावातील शालेय मुलांना स्कूल बॅग व वहयांचे वाटप केले.या कार्यक्रमाचे आयोजन दाभोळे केंद्र शाळेत करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदिप साटम,तालुका अध्यक्ष राजा भूजबळ, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर,पंचायत समिती सदस्य स्नेहा अनभवणे,सरपंच श्रीकृष्ण अनभवणे, पोलीस पाटील सानिका कदम,कायदयांचे अभ्यासक प्रदिप कदम,सदस्य मनोहर लिमये,धोंडू घाडी,सौ.घाडी,सौ.बाणे,मुख्याध्यापक श्री.पाटील,सहा.शिक्षक श्री.चोपडे,श्री.दत्तात्रय घाडी,सौ.सुर्वे,सौ.पाटील ग्रामविकास अधिकारी पांडूरंग शेडगे आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संदिप साटम,स्नेहा अनभवणे,सानिका कदम,प्रदिप कदम,श्रीकृष्ण अनभवणे, मुख्याध्यापक श्री.पाटील आदिंनी मुलांना शुभेच्छा दिल्या.या कार्यकमा निमित्त उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्री.शेडगे यांनी केले.












