नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या पूरक आहार मार्गदर्शक पत्रकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. लहान मुलांच्या संगोपन आणि आहारासंदर्भात तयार करण्यात आलेल्या या पत्रकात नऊ ते अकरा महिने वयोगटातील बालकांसाठी सुचविलेल्या आहारामध्ये बारीक चिरलेले गोमांस, मटण आणि चिकन यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्रक महानगरपालिकेच्या माता-बाल आरोग्य केंद्रांमध्ये लावण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकारावर युवासेनेने तीव्र आक्षेप घेत गोमांसाचा उल्लेख तातडीने हटवावा तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Home ताज्या घडामोडी NAVI MUMBAI : महानगरपालिकेच्या पूरक आहार पत्रकात गोमांसाचा उल्लेख; नवी मुंबईत वाद...












