शेर्ले उपसरपंच पदी भाजपाचे शामराव सावंत विजयी 

बांदा : प्रतिनिधी

शेर्ले ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या उपसरपंच पद निवड प्रक्रियेत भाजपाचे उमेदवार शामराव सावंत हे ६ विरुद्ध ३ मतांनी विजयी झाले. त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, मंडल चिटणीस बाळू सावंत, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंच्यायत सदस्य जावेद खतीब, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, मंडल कार्यकारिणी सदस्य राजेश चव्हाण, शक्ती केंद्रप्रमुख प्रवीण देसाई, मंडल युवा उपाध्यक्ष साई सावंत, बुथ अध्यक्ष अजित शेर्लेकर, बुथ अध्यक्ष दत्तात्रय देसाई, सामाजिक कार्यकर्ते विनोद सावळ तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शेर्ले ग्रामपंचायतीच्या विकासासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकजुटीने कार्य करतील आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करतील, असे पंचायत समिती सदस्य महेश धुरी यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकास प्रक्रियेत योगदान देण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीन, असे नवनिर्वाचित उप सरपंच शामराव सावंत यांनी सांगितले.

———-