रत्नागिरी : आठवडाअखेरीस होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण–दिवा–चिपळूण दरम्यान विशेष अनारक्षित (Unreserved) मेमू ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष सेवा रविवार, २८ जून २०२६ रोजी धावणार असून कोकणातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण–दिवा मेमू विशेष ट्रेन २८ जून रोजी दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुटेल व त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल.
त्यानंतर गाडी क्रमांक ०११५९ दिवा–चिपळूण मेमू विशेष ट्रेन दिवा स्थानकातून रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
ही विशेष ट्रेन अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पंचायतन आणि निलजे या स्थानकांवर थांबणार आहे.
या विशेष गाडीमध्ये एकूण ८ मेमू डबे असतील.













