देवगड भाजपा कार्यालयात खासदार नारायण राणे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

देवगड : प्रतिनिधी

 

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांनी आज देवगड येथील भाजपा कार्यालयाला भेट देऊन नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विविध व्यक्तींकडून त्यांनी निवेदने स्वीकारून त्यावर सविस्तर चर्चा केली.

 

मच्छीमार बोटींसाठी पुरवठा होणाऱ्या डिझेलच्या वर्गीकरणासंदर्भातील प्रश्नांबाबत मच्छीमार प्रतिनिधींनी खासदार राणे यांची भेट घेतली. या विषयाचा पाठपुरावा करून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी मच्छीमारांना दिले.

 

देवगड नगरपंचायतीचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी खासदार नारायण राणे यांचा सत्कार केला. तसेच भाजपा तालुका समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजा भूजबळ यांनीही त्यांचा सत्कार केला. शहराच्या वतीने शरद ठुकरुल व सर्व नगरसेवकांनी खासदार राणे यांचे स्वागत केले.

 

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी शिवसेनेच्या वतीने विविध विकासकामांसंदर्भातील निवेदन खासदार नारायण राणे यांना सादर केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले.

 

यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार अजित गोगटे, मिलिंद कुलकर्णी, बाळ खडपे, योगेश चांदोस्कर, शरद ठुकरुल, विषय समिती सभापती तन्वी चांदोस्कर, बुवा तरी, रोहन खेडेकर, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नगरसेवक व सर्व नगरसेवक वैभव कळंगुटकर, योगेश पाटकर, दया पाटील तसेच सर्व बूथ प्रमुख उपस्थित होते.