पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त डिगस पंचक्रोशीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 

कुडाळ :

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील डिगस पंचक्रोशी परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य देण्यात आल्याने पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, लक्ष्मीकांत राणे, सतीश पालव, दिनेर पालव, सतीश मोहिते, सिद्धेश पालव, रूपेश पालव, अरविंद पाताड, शुभम पाताडे, तनिष सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजाभिमुख उपक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपल्याबद्दल उपस्थितांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.