आ. दीपक केसरकर मित्रमंडळ व शिवसेनेतर्फे १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या भव्य सत्कार सोहळा

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी एका भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित आणि माननीय आमदार श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत हा सोहळा सावंतवाडी शहरातील एस. टी. स्टँड समोरील ऐतिहासिक ‘काझी शहाबुद्धीन हॉल’ येथे सायंकाळी ठीक ४:०० वाजता संपन्न होणार आहे.

तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे, त्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या वाटचालीस प्रोत्साहन देणे आणि त्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या विशेष सोहळ्याला सावंतवाडी तालुक्यातील नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वतीने करण्यात आले आहे.