दोडामार्ग तालुका ३ दिवस अंधारात; विजेच्या लपंडावामुळे नागरिक व ग्राहक आक्रमक, महावितरणला घेराव!

सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थिती 

दोडामार्ग:प्रतिनिधी 

मुसळधार पाऊस सुरू होताच दोडामार्ग तालुक्यातील महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील अनेक गावे गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंधारात चाचपडत असून, महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. याच संतापातून आज सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्राहकांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

विशेष म्हणजे, सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी भर पावसात भिजत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त ग्राहकांच्या प्रश्नांनी महावितरणचे अधिकारी पुरते निरुत्तर झाले होते.

जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे.

पाणीटंचाई: वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अनेक गावाचा

संपर्क तुटला असून मोबाईल नेटवर्क गायब झाल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे. यामुळे

आर्थिक नुकसान उद्योग-व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले असल्याने झाले आहेत.

शैक्षणिक नुकसानही झाले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

‘स्मार्ट मीटर’चा गाजावाजा, पण पायाभूत सुविधा शून्य अशी परिस्थिती आहे

“एका बाजूला स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आधुनिकतेचा गाजावाजा केला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला मूलभूत पायाभूत सुविधांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीची कामे झाल्याचे दावे केले जातात, मग पहिल्याच पावसात वीज का जाते? या कामांच्या गुणवत्तेची चौकशी झाली पाहिजे.”अशा भावना व्यक्त केल्या आहेत गणेश मूर्ती कलाकार यांना मोठी झळ बसली आहे त्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच

जीर्ण झालेले विद्युत पोल, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या आणि क्षमतेबाहेर काम करणारे ट्रान्सफॉर्मर यामुळे किरकोळ पावसातही वीज खंडित होते. हा दोष स्थानिक कर्मचाऱ्यांचा नसून वर्षानुवर्षे पायाभूत सुविधांकडे वरिष्ठ पातळीवरून झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे, हे समजून शकतो पण वीज सुरळीत सुरु ठेवा अशी मागणी करण्यात आली आहे .

दोडामार्गसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून जीर्ण वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करावे, नवीन खांब आणि सक्षम ट्रान्सफॉर्मर बसवावेत.आदी मागण्या करण्यात आल्या

साटेली-भेडशी आणि संपूर्ण तालुक्यातील वायरमन व अधिकारी नागरिकांचे फोन उचलत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून त्यांची साटेली-भेडशी परिसरातच नियुक्ती करावी.अशी मागणी करण्यात आली

“वीज बिल वेळेत घेतात ना, मग वीजही वेळेत द्या!”

“महावितरण ज्याप्रमाणे ग्राहकांकडून वीज बिल वेळेत आणि सक्तीने वसूल करते, त्याच तत्परतेने ग्राहकांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा का दिला जात नाही?” असा थेट सवाल उपस्थित करत उपस्थित जनतेने महावितरणला धारेवर धरले. “वीज ही चैनीची वस्तू नसून आमचा मूलभूत हक्क आहे,”

या आंदोलनात सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक गवस, सेनेचे तालूका प्रमुख संजय गवस, सुभाष दळवी, प्रकाश देसाई, संदीप गवस, संदेश वरक, प्रकाश गवस, भूषण सावंत यांच्यासह महिला ग्राहक श्रीमती कुंदेकर आणि मोठ्या संख्येने सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्राहक उपस्थित होते. वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.