चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शनिवारी पाग कन्याशाळेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या SIR कार्यक्रमासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पूर परिस्थितीवर चर्चा करण्यात आली व कै. अजित दादा पवार यांची दि.२२ जुलै रोजी जयंती साजरी करण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने सोमवार दिनांक.१३ जुलै पासून तालुक्यांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये जनतेचे प्रश्न सुटण्याकरिता काही अडचणी निर्माण झाल्यास तालुक्यातील आमदार शेखर निकम यांचे जनसंपर्क कार्यालय चिपळूण येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व आठवड्यातून पाच दिवस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यालय मध्ये उपस्थित राहून प्रश्न समजून घेणार आहेत. आठवड्यातून चार दिवस प्रांतिकचे उपाध्यक्ष शौकत भाई मुकादम, जयंद्रथ खताते, अबूशेठ ठसाले हे उपलब्ध होतील. व आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले तसेच जिल्हा व पंचायत समितीचे सदस्य हे सुद्धा कार्यालय मध्ये उपस्थित राहणार आहेत. तालुक्याचे आमदार या सर्व विषया संबंधित आढावा घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. आजच्या बैठकीमध्ये माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संपर्क कार्यालय मध्ये उपस्थित राहून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत असा ठराव मांडला व तो सर्वांनी मान्य केला.. बैठकीच्या सुरुवातीला तालुका अध्यक्ष नितीन उर्फ अबुशेठ ठसाळे यांनी प्रस्ताविक केले.
या बैठकीला क्रांतीचे उपाध्यक्ष शौकत मुकादम, सेक्रेटरी जयंद्रथ खताते, तालुका अध्यक्ष नितीन उर्फ अबुशेठ ठसाळे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, दादासाहेब साळवी, दिशा दाभोलकर, महिला शहराध्यक्ष आदिती देशपांडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष रवीना गुजर, तालुकाध्यक्ष समीर काझी, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, शहर सरचिटणीस मनोज जाधव, किसन चिपळूणकर, युवक तालुका अध्यक्ष निलेश कदम, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, नेहा रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते व सेक्रेटरी जयंद्रथ खताते यांनी मार्गदर्शन करून बैठकीचा समारोप केला.













