उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांचा पुढाकार, न. पं. प्रशासन व स्थानिक नागरिकांचे सहकार्य
संतोष कोत्रे
लांजा-: लांजा गाव ते शहर अशा बदलाचा साक्षीदार असलेला आणि काही दिवसांपूर्वी वादळात उन्मळून पडलेल्या श्रीराम मंदिर परिसरातील
सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या पिंपळ वृक्षाची लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांनी शनिवारी पुनर्लागवड केली. त्यामुळे
धार्मिक भावना जोडल्या गेलेल्या असलेला हा पिंपळ वृक्ष पुन्हा एकदा उभारी घेण्यास सज्ज झाला आहे.
गावागावांमध्ये असलेल्या देवराया, येथील देवस्थान भोवती असलेले पुरातून वृक्ष हे त्या गवातील
लोकांच्या धार्मिक भावनेशी बांधले गेलेले असतात. अशाच पद्धतीने लांजा शहरातील श्रीराम मंदिर या ठिकाणी पुरातन असा पिंपळ वृक्ष आहे. हा वृक्ष सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते. लांजा गाव ते गावाचे शहरात झालेले रूपांतर या सर्व बदलाचा साक्षीदार हा पिंपळ वृक्ष आहे. लांजा तील अनेक पिढ्यांचा तो साक्षीदार आहे.
काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हा पुरातन पिंपळवृक्ष उनमळून पडला होता. त्यामुळे लांजातील अनेक ग्रामस्थांनी हळहळ देखील व्यक्त केली होती.
या पिंपळ वृक्षाशी अनेक जुन्या जाणत्या लोकांची असलेली धार्मिक भावना लक्षात घेऊन लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष असलेले मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांनी या पिंपळ वृक्षाची पुनर्लागवड लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज शनिवारी ११ जुलै रोजी सकाळी उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) यांच्या पुढाकारातून वृक्षाच्या योग्य भागांची शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्लागवड करण्यात आली. यावेळी शिवाप्पा उकळी, बबन स्वामी, नगरसेवक पंढरी मायशेट्ये, तसेच संजय तेंडुलकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात स्थानिक नागरिक आणि वृक्षप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
अशाप्रकारे उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांच्या पुढाकारामुळे लांजा गावच्या स्थित्यंतराचा साक्षीदार असलेला ह पिंपळ वृक्ष पुन्हा एकदा नवी उभारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे












