डेरवण ट्रस्ट विद्यार्थ्यांचा सहभाग
चिपळूण (वार्ताहर) : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. डेरवणच्या वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झाला. चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता शिर्के यांनी सर्वांचे स्वागत, प्रस्ताविक केले. यावेळी डेरवण मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कुटुंब नियोजनावर नाट्यकरण सादर करून जनजागृती केली. डेरवणचे डॉ. रविकिरण कामटे उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी लोकशाही जनजागृती कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. निकिता शिर्के यांनी सर्वांना धन्यवाद दिले.













