अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते उत्साहात आवळा व कडुलिंब रोपांचे रोपण
मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब मालवण्या वतीने सामाजिक उपक्रम अंतर्गत अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते राजकोट मेढा येथे नंदू देसाई यांच्या घर परिसरात आवळा व कडुलिंब रोपांचे रोपण उत्साहात पार पडले.
यावेळी लायन्स क्लबच्या सौ जयश्री हडकर, गणेश प्रभुलकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर यांसह नंदू देसाई, संदेश कोयंडे उपस्थित होते.
लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक, सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्याच अनुषंगाने वृक्षारोपण उपक्रम उस्फूर्तपणे राबवण्यात आला.











