संदेश तांबे आणि सुरेंद्र मोरे याची कौतुकास्पद कामगिरी
गौरव पोंक्षे माखजन:
सावंतवाडी हून सातारा येथे पोहचल्यावर त्या ठिकाणाहून पायी दिंडीतून पंढरपूर ला जाण्यासाठी निघालेल्या सावंतवाडीच्या श्री तुलसीदास न्हावेलकर यांचा मोबाईल चिपळूण ला पडला. हा मोबाईल
मिळताच स्टेट बँक लाईफ इन्शुरन्स मध्ये अधिकारी असलेल्या श्री संदेश तांबे,आणि सुरेंद्र मोरे यांनी तात्काळ श्री न्हावेलकर यांना सुपूर्द केला. या दोन्ही अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीमुळे चिपळूणात अजूनही माणुसकीचा झरा ओला असल्याचे दाखवून दिले.
सविस्तर वृत्त असे की मंगळवारी रात्री १० च्या सुमारास, तुलसीदास न्हावेलकर हे सावंतवाडी ते सातारा असा प्रवास करताना चिपळूण पोहचले.खाजगी आराम बस ने ते प्रवास करत होते.आराम बस चिपळूणातील झांट्ये काजू च्या इथे आसपास असताना श्री न्हावेलकर यांच्या खिशातून मोबाईल पडला तो थेट रस्त्यावर,आराम बस चालकाला सांगितल्यावर ,त्यांना आराम बस फार वेळ थांबणार नाही असे सांगितले व त्यांना शिवाजी नगर बस स्थानकासमोर सोडून बस निघून गेली.रस्त्यावर पडलेला मोबाईल कुणाला मिळाला असेल?गाडी तर वरून गेली नसेल ना..असे एक ना अनेक प्रश्न मनात घोंगावत असताना ,घाम फुटलेल्या अवस्थेत चालत चालत ते मोबाईल शोधत चालले होते.अतिथी ग्रँड च्या इथे पत्रकार,शिक्षक गौरव पोंक्षे कुटुंबासमवेत उभे असताना,श्री न्हावेलकर यांनी श्री पोंक्षे यांना मोबाईल कुठे पडलेला आढळला का.असे विचारून सर्व हकिगत सांगितली.श्री गौरव पोंक्षे यांनी हरवलेल्या मोबाईल वर फोन लावला.समोरून फोन ला प्रतिसाद मिळाल्याने व फोन सापडला ह्या सुखद धक्याने,पंढरपूर चा पांडुरंग वारीला जाण्यापूर्वीच भेटला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
स्टेट बँक लाईफ इन्शुरन्स मध्ये काम करणाऱ्या या दोघांना मोबाईल दिसताच क्षणी त्यांनीही त्या मोबाईल वरील डायल नंबर वरून तात्काळ फोन करून त्यांच्या नातेवाईकांना कळवले होते.ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी हा मोबाईल दिल्याने श्री न्हावेलकर यांचे मन भरून आले.श्री न्हावेलकर याना सातारा येथे जायचे असल्याने श्री सुरेंद्र मोरे यांनी स्वतःच्या गाडीने बस स्थानकात सोडले.
श्री तुसीदास् न्हावेलकर हे वारकरी असजन मूळ सावंतवाडी चे असून पंचायत समितीतीतून सेवानिवृत्त झाले आहेत.काही काळ चिपळूण ला देखील सेवेत होते.राजापूर पंचायत समितीतून सेवानिवृत्त झाल्याचे त्यांनी सांगितले.व् साऱ्यांचे आभार मानत पंढरपूर ला सातारा येथून जाणाऱ्या पायी दिंडीत समाविष्ट होण्यासाठी प्रस्थान केले.













