ईगल स्केटर्स क्लब, दापोलीच्या खेळाडूंची विश्वविक्रमाला गवसणी..

दापोली | प्रतिनिधी : ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ईगल स्केटर्स क्लब, दापोलीचे खेळाडू कु. प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे, कु. सई महेश महाडिक व जैद झुबेर बालाभाई यांनी आपली भारत माता आणि क्रांतिकारकांसाठी स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम म्हणत नॉनस्टॉप एक तास स्केटिंग करत होप इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड, वज्र वर्ल्ड रेकॉर्ड, द मिरॅकल रेकॉर्डस, इंडिया , ग्लोबल जीनियस रेकॉर्डस हे चार रेकॉर्ड यशस्वीरीत्या पूर्ण केले.

या तिघांचा उत्साह वाढवण्यासाठी साहिल गडदे याने या खेळाडूंसोबत रेकॉर्ड पूर्ण होईपर्यंत स्केटिंग केले. ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत भारतातील विविध राज्यातून 1200 स्केटिंग खेळाडूंनी एकाच वेळी सर्वत्र आपापल्या शहरात संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत राष्ट्रध्वज हातात घेऊन वंदे मातरम म्हणत हे चार रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण केली.

चारही रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कु. प्रद्युम्न दाभोळे, कु. सई महाडिक व जैद बालाभाई यांना जिल्हा परिषद शाळा अगरवांयगणी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक श्री चंद्रकांत महादेव उजाळ यांच्या हस्ते मेडल देऊन गौरविण्यात आले.

या तिन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. प्रथमेश दाभोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा रेकॉर्ड अटेम्प्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सौ. प्रिती दाभोळे यांनी काम पाहिले.

या सर्व यशस्वी खेळाडूंना भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष्या सौ. संपदा पारकर, डॉ. सौ. विद्या दिवाण, श्री. महेश्वर जाधव,श्री. शैलेश मिसाळ, श्री. योगेश कदम, श्री. महेश व सौ. अपूर्वा महाडिक,फरहीन बालाभाई, सिमरन हलदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंवर दापोलीतून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.