रानभाजी पाककला स्पर्धेस प्रतिसाद!

▪️बॅ नाथ पै सेवांगण कट्टाचे आयोजन.

मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने आयोजित रानभाजी पाककला स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद दिला.

बक्षीस समारंभ ॲड. समृद्धी म्हाडगुत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

ॲड. समृद्धी म्हाडगुत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. रानभाज्या पौष्टिक असून त्या त्या काळात त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. सेवांगणाने ही स्पर्धा आयोजित करून पर्यावरणाचा सुद्धा संदेश दिला आहे. त्यासाठी सेवांगणाचे अभिनंदन करते. सेवांगणाच्या अनेक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

परीक्षक प्रियांका भोगटे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

दीपक भोगटे यांनी या स्पर्धेचा उद्देश कथन केला. त्या त्या काळातील रानभाज्या खाणे आवश्यक आहे. त्याची प्रसिद्धी व्हावी म्हणून या स्पर्धा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे-

प्रथम क्रमांक विभागून हर्षदा प्रशांत गवस, विशाखा स्वप्नील आपटे

द्वितीय क्रमांक – संचिता रघुनाथ चव्हाण, ममता कपील गुरव

तृतीय क्रमांक – प्राजक्ता प्रल्हाद म्हापणकर, अर्चना आनंद धुत्रे, अंजली चंद्रशेखर बिलये.

चतुर्थ क्रमांक – स्वाती गुरुनाथ पोखरणकर,

कृतिका राजेंद्र पंधारे, सुप्रिया वंदेश ढोलम,

पाचवा क्रमांक – प्रगती प्रशांत म्हाडगुत,अनघा अमित आपटे,

उत्तेजनार्थ – दिव्या दीपक वरक, मयुरी निलेश पेडणेकर,पूजा संकेत तळावडेकर, सोनाली जानू गावडे, आरती मंगेश मेस्त्री,

मनश्री मंगेश वाईरकर.

सर्वांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी अमन कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगीतून १३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.

 

या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, ॲड. समृद्धी म्हाडगुत, वीणा म्हाडगुत, प्रियांका भोगटे, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, मारुती गावडे, विद्या चिंदरकर, अर्चना धुत्रे, मंगल पराडकर, साक्षी अमरे, मनोज काळसेकर, बाळकृष्ण गोंधळी

स्पर्धक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.