पळसंब येथे रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न 

 

▪️ श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब शाळा नं. १ येथे श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाच्या वतीने दशक्रोशी मर्यादित रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिप प्रज्वलन रानभाजी अभ्यासक श्री. राजा शृंगारे व उद्घाटन मालवण तालुका कृषी आत्मा समितीचे अध्यक्ष प्रताप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्या सौ.वर्षा सांबारी, मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत, श्रावण सरपंच श्री.नम्रता मुद्राळे, पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, मंडळाचे आजीव सभासद दिगंबर साटम, माधवी पळसंबकर, पत्रकार सुयोग पंडित, डॉ सुरेश भोगटे, माजी उप सभापती अशोक बागवे, ग्रामपंचायत अधिकारी अमित कांबळी, ग्राम.सदस्य सत्यवान तेजम, ऋतुजा सावंत, पोलीस पाटील पुनम गोलतकर, आडवली हायस्कुल मुख्याध्यापक श्री. तुषार सकपाळ, त्रिबंक हायस्कुलचे श्री.सुतार सर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. विनोद कदम सर यांनी केले.

कोकणी माणूस याच रानभाज्या खावून पूर्ण पणे सशक्त होता. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत रासायनिक खतांचा वापर करून पोटात जाणाऱ्या बाजारातील भाज्या कमी प्रमाणात खा.आपल्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाने दिलेल्या रान भाज्या मात्र जरूर खा त्यामुळे आपण नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने फिट राहू असे आवाहन कोकणी रानभाजी अभ्यासक श्री.राजा शुंगारे यांनी करत रानभाजीचे महत्व, आरोग्यासाठी फायदे याचे महत्व सांगीतले. मान्यवरानी मनोगत व्यक्त केले. पाक कला स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक तन्वी जगदिश घाडीगावकर (आडवली ), द्वितीय सिमा शरद घाडीगावकर (आडवली ), तृतीय विक्रांती प्रविण साटव ( आडवली ), उतेजनार्थ जयवंती जयवंत सावंत ( पळसंब ) तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. दशक्रोशीतील तीस स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत कायक्रमात उत्साह वाढवला. परिक्षक म्हणून कोकणी रानभाजी अभ्यासक श्री. राजा शुंगारे व जिल्हा परिषद सदस्य सौ. वर्षा सांबारी यांनी केले. प्रथम पारितोषिक रोख रक्कम राणेशाही हॉटेल, द्वितीय रोख रक्कम उद्योजक रियान मुजावर, तृतीय रोख रक्कम आजीव सभासद डॉ श्री . सुरेश भोगटे तर उतेजनार्थ मंडळाच्या वतीने देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकत्यांनी व ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय होती असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत यांनी केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्षश्री अमरेश पुजारे, अमित पुजारे, शेखर पुजारे, हितेश सावंत, संतोष परब, रामचंद्र पुजारे, वैभव परब, शिक्षिका नेहा गवाणकर, पल्लवी सोनगडे उपस्थित होते.