एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाची शैक्षणिक व प्लेसमेंट क्षेत्रात दमदार कामगिरी

कणकवली :* सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाने शैक्षणिक गुणवत्ता आणि प्लेसमेंट या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे.

 

सन २०२५-२६ च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत संगणक अभियांत्रिकी विभागाचा निकाल तब्बल **९७ टक्के** लागला. एकूण ५८ विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी यशस्वी झाले. विभागात **कु. साहिल आवटे (९.५१ सीजीपीआय)** यांनी प्रथम, **कु. जेसिया फर्नांडिस (९.३० सीजीपीआय)** यांनी द्वितीय तर **कु. समृद्धी ढोके (९.०४ सीजीपीआय)** यांनी तृतीय क्रमांक मिळवून विभागाच्या यशात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राध्यापकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण परिश्रमांना दिले आहे.

 

शैक्षणिक यशाबरोबरच विभागाने प्लेसमेंटमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागातील विद्यार्थ्यांची **Accenture Solutions Pvt. Ltd., CRISIL, Tata Consultancy Services (TCS), Bridgenext India Pvt. Ltd. आणि Aurionpro Solutions Pvt. Ltd.** यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यामध्ये **अक्षय अशोक नवले** यांची Accenture मध्ये **६.५ लाख रुपये वार्षिक वेतन पॅकेज*, *सागर सत्यवान बंड ** यांची CRISIL मध्ये *६ लाख रुपये वार्षिक वेतन पॅकेज*, तसेच अनेक विद्यार्थ्यांची *TCS, Bridgenext आणि Aurionpro मध्ये *४.५ लाख रुपये वार्षिक वेतन पॅकेजवर* निवड झाली आहे. याशिवाय *QSpiders* मार्फत २३ विद्यार्थ्यांना ट्रेनी इंजिनिअर म्हणून संधी मिळाली असून विभागाच्या प्लेसमेंट यशात भर पडली आहे.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. डी. एस. बाडकर* यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या कठोर परिश्रमाबरोबरच प्राध्यापकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे फलित आहे. विभागप्रमुख **प्रा. स्वप्नील कदम** यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि कौशल्यविकासावर भर दिल्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले.

 

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा **सौ. नीलमताई राणे**, उपाध्यक्ष **श्री. निलेश राणे**, सचिव **आ. नितेश राणे**, प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.