विशेष व्याख्यानासह पुष्पगुच्छ रचना स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
देवरूख (प्रतिनिधी):
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष व्याख्यान व पुष्पगुच्छ रचना स्पर्धेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या श्रीमती सुजाताताई दळवी यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, गुरुंचे जीवनातील स्थान आणि संस्कारमूल्ये याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच संस्कारांची कास धरून समाजाभिमुख नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. प्रा. संदीप मुळ्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडत असल्याचे सांगितले.
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पुष्पगुच्छ रचना स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. सीमा शेट्ये यांनी केले, तर स्पर्धेचे परीक्षण प्रा. धनंजय दळवी यांनी केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कल्पकता, कलात्मकता आणि पर्यावरणपूरक संकल्पनांचा उत्कृष्ट मिलाफ साधत आकर्षक पुष्पगुच्छ साकारले होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करून शिक्षकांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कार जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सीमा कोरे यांच्यासह प्रा. सानिका भालेकर, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी, प्रा. वसंत तावडे आणि प्रा. आर्य अणेराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पुष्परचना स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक: (विभागून)
अनुष्का दिनेश चव्हाण (१२वी संयुक्त- वाणिज्य) व मयुरी चंदूलाल पटेल (११वी वाणिज्य).
द्वितीय क्रमांक: (विभागून)
स्नेहा संजय चव्हाण (११वी संयुक्त) व सानिका संतोष सनगले (१२वी कला).
तृतीय क्रमांक: (विभागून)
सेजल संदीप बोरे (११वी वाणिज्य) व जान्हवी हेमंत चव्हाण (११वी वाणिज्य)
उत्तेजनार्थ :
आर्यन महेश सोनवडकर (१२वी वाणिज्य- ‘ब’), कस्तुरी सुभाष गीते (११ वी वाणिज्य) आणि भक्ती संदीप पर्शराम (११वी वाणिज्य).
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदरभाव, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.












