कोलगाव येथे प्रेरणा प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

 

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जोडोन्नती – जीवनोन्नती अभियाना अंतर्गत प्रेरणा प्रभाग संघ, कोलगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० जुलै २०२६ रोजी निरामय केंद्र, कोलगाव येथे संपन्न झाली. सभेची सुरुवात प्रभाग संघ अध्यक्ष सविता कासार यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

या सभेदरम्यान मागील सभेचे इतिवृत्त वाचन, आर्थिक पत्रक वाचन, सनदी लेखापाल निवड, IFC, वार्षिक कृती आराखडा व व्यवसाय आराखडा निश्चित करणे तसेच मागील वर्षाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभाग संघ स्तरीय तीन ग्राम संघ व समूहांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून गौरविण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, कोलगाव सरपंच संतोष राऊल, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, कारिवडे सरपंच आरती माळकर, तालुका व्यवस्थापक शिवानंद गवंडे, प्रभाग संघ अध्यक्ष सविता कासार, सचिव क्षितिजा धुरी, कोषाध्यक्ष लीना आल्मेडा, प्रभाग समन्वयक अभय भिडे, IFC ब्लॉक अँकर कनक सुकी, स्नेहा परब यांसह विविध ग्राम संघांचे पदाधिकारी, उपसमिती सदस्य, सर्व केडर, लिपिका व समूह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन स्नेहा परब यांनी केले.