शिर्के प्रशालेच्या गुरुकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांनी वाहिली आदरांजली

रत्नागिरी : add बाबासाहेब नानल गुरुकुल शाळेमध्ये आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, टिळकांवरील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या गुणवंत मुलांनी आपले प्रभावी भाषण सादर केले. त्यानंतर गुरुकुल शिक्षिका सौ. सरोज पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी व योगदानाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रेरणादायी उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि समाजकार्याची जाणीव निर्माण झाली.

या निमित्ताने शाळेमध्ये पुष्पहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले हे सुंदर हार टिळकांच्या जन्मस्थानी नेऊन तेथील टिळकांच्या पुतळ्याला आदरांजली म्हणून अर्पण करण्यात आले.