जागुष्टे हायस्कूलमध्ये सायबर जागरूकता मोहीम उत्साहात; विद्यार्थ्यांनी घेतली सुरक्षिततेची शपथ

रत्नागिरी:

गोगटे जोगळेकर कॉलेजचा ‘Cyber Warrior Club’ आणि ‘Quick Heal Foundation’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल, कुवारभाव येथे “Cyber Shiksha for Cyber Suraksha” ही सायबर जागरूकता मोहीम उत्साहात पार पडली. मुख्याध्यापक श्री. भास्कर झोरे सर व सौ. चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
​या वेळी क्लबचे सदस्य राज गुरव, आयुष सनगरे, अनुष्का झगडे व पूर्वा सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना OTP, फिशिंग, बनावट लिंक्स, QR कोड फसवणूक आणि सायबर बुलिंग यांसारख्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचे उपाय सांगितले. मजबूत पासवर्ड वापरणे आणि वैयक्तिक माहिती गुप्त ठेवण्याबाबत मार्गदर्शन करून सर्व उपस्थितांना सायबर सुरक्षेची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना जबाबदार डिजिटल नागरिक बनवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.