▪️२०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक
मसुरे | झुंजार पेडणेकर :मालवण तालुक्यातील वायंगवडे येथील पुष्कर संदीप राणे याने सिंधुदुर्ग जिल्हा अथलेटीक असो. आयोजित जिल्हास्तरीय २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण नसताना ग्रामीण भागातून ही कामगिरी केल्याने त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
पुष्कर हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील असून त्याचे आई-वडील शेती व्यवसाय करतात. त्याची आई वायंगवडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे. यावर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुष्करने शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
यावेळी माजी पोलिस अधिकारी राजेंद्र राणे यांनी पुष्करचे अभिनंदन करून, धावण्याच्या स्पर्धांमध्ये सातत्य राखण्याचा तसेच मॅरेथॉन स्पर्धांमध्येही सहभागी होण्याचा सल्ला दिला.












