रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयने ५९ व्या युवा महोत्सवाच्या दक्षिण रत्नागिरी प्राथमिक फेरीत उल्लेखनीय यश संपादन केले.
शैक्षणिक वर्ष २०२६ मध्ये ६ ऑगस्ट २०२६ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे ५९ व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात देव-घैसास-कीर महाविद्यालयाने चार कला प्रकारांत सहभाग नोंदविला. महाविद्यालयातील एकूण २५ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. स्किट (मराठी) स्पर्धेत महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कथाकथन स्पर्धेत (मराठी) कु. प्राची बोंबले हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
वादविवाद स्पर्धा (हिंदी) मध्ये कु. स्वाराली इंदुलकर व कु. सीमा जांगिड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. कार्टूनिंग स्पर्धेत कु. आदित्य नेवरेकर याने तृतीय क्रमांक मिळविला. रांगोळी स्पर्धेत कु. महेश्वरी नांदगावकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. तसेच एकपात्री स्पर्धेत (मराठी) कु. गौरी ओळकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारत शिक्षण मंडळ संस्था पदाधिकारी व संस्थाचे सचिव धनेश रायकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख ऋतुजा भोवड तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांनी कला व सांस्कृतिक क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली आहे.












