लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आपल्या रिक्षा चालक-मालक सभासदांना नुकतेच २०० काजू कलमांचे वाटप करण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीला चालना देण्याच्या उद्देशाने लांजा तालुका रिक्षा चालक मालक संघटनेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. प्रत्येक सभासदाने मिळालेल्या रोपाची लागवड करून त्याचे संगोपन करावे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवडीचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास रिक्षा संघटनेचे अध्यक्ष लहू कांबळे, उपाध्यक्ष संतोष भडेकर, जनरल सेक्रेटरी नरेश लांजेकर, जॉइंट सेक्रेटरी रवींद्र कांबळे, खजिनदार मंगेश बापेरकर तसेच सदस्य गुरुप्रसाद तेली, देवेंद्र वालकर, विजय खानविलकर, शशिकांत दळवी, चंद्रकांत रहाटे, गणेश खानविलकर आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.












