चिपळूण : रोटरी क्लब पिंपरी टाऊनचे अध्यक्ष संतोष भालेकर यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. त्यांचे काम अत्यंत कौतुकास्पद असेच असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते लाभदायक असल्याचे गौरवोद्गार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ओमळीचे उपाध्यक्ष तथा शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख सुभाष जाधव यांनी काढले.
पावसाळ्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना अडचणी येऊ नयेत, या सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब पिंपरी टाऊनच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल ओमळी या प्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुभाष जाधव बोलत होते. त्यांनी रोटरी क्लब पिंपरी टाऊनचे अध्यक्ष संतोष भालेकर व संस्थेचे संचालक पत्रकार सुभाष कदम यांनी ही मदत मिळवून दिल्याने आभार व्यक्त केले. रोटरी क्लब पिंपरी टाऊनचे अध्यक्ष संतोष भालेकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सुभाष कदम यांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांसाठी रेनकोट उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लब पिंपरी टाऊनचे अध्यक्ष भालेकर आणि सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करत आभार व्यक्त केले.
यावेळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पांडुरंग कामळे, खजिनदार श्रीराम पवार, संचालक सुभाष कदम, मुख्याध्यापक सुधाकर गंगावणे, उपशिक्षक अजित आंबवकर, मिलींद विखारे, इंजि. सुयोग कदम, उपशिक्षिका सौं. एस. व्ही. खोत, सौं. ए. डी. चौंधरी, सौं. जाधव उपस्थित होते. मुख्याध्यापक सुधाकर गंगावणे यांनी सर्वांचे स्वागत केले. अजित आंबवकर यांनी सूत्रसंचालन केले व रोटरी क्लबचे आभार मानत विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
फोटो – ओमळी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करताना उपाध्यक्ष सुभाष जाधव, पांडुरंग कामळे, सुभाष कदम, मुख्याध्यापक सुधाकर गंगावणे, श्रीराम पवार, अजित आंबवकर, सुयोग कदम, मिलींद विखारे आदी












