महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघ या संघटनेच्या लांजा तालुका अध्यक्षपदी मिलिंद वाघाटे यांची निवड

लांजा (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघ या संघटनेच्या लांजा तालुका अध्यक्षपदी आसगे केंद्राचे केंद्रीय प्रमुख मिलिंद प्रभाकर वाघाटे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ ही संघटना राज्यव्यपी केंद्र लोकांचे नेतृत्व करणारी बलाढ्य संघटना आहे. या संघटनेचे राज्य नेते बाबाजी शिर्के व केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी नुकतीच एका पत्रकाद्वारे मिलिंद वाघाटे यांची लांजा तालुका केंद्रप्रमुख संघ या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणारे पत्र सुपूर्द केले आहे. त्याचप्रमाणे उर्वरित कार्यकारी संचालक मंडळ गठित करण्याची सूचना मिलिंद वाघाटे यांना करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख संघटना शाखा लांजाच्या वतीने सर्व केंद्रप्रमुखांना प्रशासकीय कामात सुलभता येण्यासाठी केंद्रप्रमुख संघ मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख या संघटनेच्या छताखाली एकत्र झाले आहेत. दैनंदिन प्रशासकीय कामकाजात विविध प्रकारचे मार्गदर्शन करणे केंद्रप्रमुखांच्या हक्क व कर्तव्य याबाबतीत प्रशासकीय पातळीवर जनजागृती करणे त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख यांचा जॉब चार्ट प्रमाणे काम करून त्यांचा सन्मान वाढविणे यासारखी कार्य संघटनेचे वतीने करण्यात येतील असे सुतोवाच लांजा तालुका अध्यक्ष मिलिंद वाघाटे यांनी केले आहे.