नामवंत कलाकारांची लाभली साथ
मुंबई:
बंकिमचंद्र चटर्जी लिखित आणि भारताचे राष्ट्रीय गीत असलेले ‘वंदे मातरम’ एका नव्या आणि प्रभावी स्वरूपात श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार नंदेश वत्सले विठ्ठल उमप यांनी या गीताला केवळ स्वरच दिला नाही, तर ते संगीतबद्धही केले आहे .
या गीताचे संगीत संयोजन नंदेश उमप आणि उदय साळवी यांनी मिळून केले असून, म्युझिक प्रोग्रामिंगची जबाबदारी उदय साळवी यांनी पार पाडली आहे. गीतातील तालबद्धता सत्यजित जामसांडेकर यांनी नियोजित केली असून, लाइव्ह रिदममध्ये त्यांना प्रसाद मायेकर, तेजस सातारडेकर आणि मयूर मगरे यांची साथ लाभली आहे. रवी चारी यांचे सितारवादन आणि विजय तांबे यांचे बासरीवादन या गीताची गोडी अधिकच वाढवते.
स्वरसाज: या सादरीकरणात अनेक नामवंत गायकांनी आपला आवाज दिला आहे . गायकांमध्ये नंदेश उमप यांच्यासह प्रसाद विभूते, अभिषेक गाडेकर, दिनेश नाडकर आणि अतुल पोडवाल यांचा समावेश आहे . तर, महिला स्वरांमध्ये रूपाली पाटील, पूनम पगारे, प्राजक्ता माहुलकर, माहेक शेख आणि गौरी डोंगरे यांनी सुरेल साथ दिली आहे.
या गाण्याचे ध्वनिमुद्रण ‘एएमव्ही’ स्टुडिओमध्ये हर्ष भोईर यांनी केले असून, तुषार पंडित यांनी गाण्याचे मिक्स आणि मास्टरिंग केले आहे. गाण्याचा व्हिडिओ विश्वास राख यांनी साकारला असून, शशांक एस. कोंडविलकर यांनी व्हिडिओ संकलन आणि ग्राफिक्सची धुरा सांभाळली आहे.
या संपूर्ण भव्य प्रकल्पाची निर्मिती सरिता नंदेश उमप यांनी केली आहे. देशभक्तीने प्रेरित असलेले हे ‘वंदे मातरम’ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून, रसिकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.












