कळणे माऊली बॉईज तर्फे १६ ऑगस्टला रक्तदान शिबीर

​दोडामार्ग : प्रतिनिधी
रुग्णालयातील रक्ताची गंभीर टंचाई लक्षात घेता कळणे माऊली बॉईज आणि ऑन कॉल रक्तदाते सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवार १६ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर कळणे आरोग्य केंद्र येथे होणार आहे.

​रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा दूर करून गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रुग्णांचे प्राण वाचावेत या सामाजिक उद्देशाने माऊली बॉईज कळणे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या शिबीरात नागरिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

​रक्तदानाबाबत अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ​बाळानंद देसाई (७५८८५७००६७), ​संकेत देसाई (८६९८२६०१४४), ​सिद्धू परब (८०८०९९९३८२) किंवा ​सुहास देसाई (९६७३१५६८२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.