देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्या पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

देवगड,  : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कोंडवाड्याचे उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष राजा भुजबळ आणि शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी केले आहे.