पी. ए. मनवर आणि पी. एल. घाडी यांना १० वर्षे सुरक्षित बिल्ला
विजयदुर्ग (प्रतिनिधी ) : विजयदुर्ग एसटी आगारातील सुरक्षित सेवा देणाऱ्या २२ चालकांचा सन्मान आगार व्यवस्थापक शेतवडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये पी. ए. मनवर आणि पी. एल. घाडी यांना १० वर्षे सुरक्षित सेवा दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
याचबरोबर अन्य २० जणांना ५ वर्षे सुरक्षित सेवा दिल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये के. व्ही. घरकर, आय. आय. मुकादम, आर. बी. कोकरे, आर. एस. खुडकर, एन.डी. निकम, एस. ए. गाढे, पी. पी. गावकर, के. बी. काळे, बी. एस. शिरसाट, एस. जी. धाडसे, व्ही. एस. सुरवसे, पी.के. तांबे, डी.सी. महाजन, एन एस जाधव, एस. एस. शेख, पी.बी.आयवाळे, आर. पी. पाटील, यु. व्ही. राऊत, ए. बी. राठोड आणि एस. ए. माळगावकर या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना सन्मानपत्र देऊन आगार व्यवस्थापक शेतवडेकर तसेच वाहतूक नियंत्रक राकेश तेली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ चालक एम. आर. फर्नांडिस पी. वाय. मिठबावकर आदी मान्यवर उपस्थित होते.













