वेंगुर्ले येथे “अखंड भारत संकल्प दीन” बजरंग दल वेंगुर्ला तर्फे उत्साहात साजरा…

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले शहरातील पाटकर हायस्कूल येथे “अखंड भारत संकल्प दीन” बजरंग दल वेंगुर्ला तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.विश्व हिंदू परिषद बजरंग दल वेंगुर्ला वतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. अखंड भारत ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून आपल्या प्राचीन इतिहासाची सांस्कृतिक परंपरेची आणि समाज वारसाची आठवण करून देणारी संकल्पना आहे. भारत भूमीने हजारो वर्षे विविध विचार, परंपरा,भाषा आणि संस्कृतीना आपल्यामध्ये सामावून घेतले आहे यावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सुधीर ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक बजरंग दल चे तालुका संयोजक श्री मयुरेश पेडणेकर तसेच आभार बजरंग दल चे कार्यकर्ते श्री नवनाथ सावंत यांनी मानले.
कार्यक्रमास विश्व हिंदू परिषद चे प्रखंड मंत्री श्री आपा धोंड, बजरंग दल संयोजक, सह संयोजक आणि मोठ्या संख्येने बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.