चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. महाविद्यालय (स्वायत्त), स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एनएसएस ,एन.एस एस.विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये एनसीसी कॅडेट्स आणि एनएसएस स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हातात राष्ट्रध्वज अर्थात तिरंगा घेऊन तसेच देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरातून रॅली काढली. संपूर्ण परिसरात देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
या रॅलीतून एकात्मता, शिस्त आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. या रॅलीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता व ऐक्याचा संदेश समाजात पोहोचवणे हा होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि यशस्वी ठरला. या रॅलीद्वारे ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचा संदेश प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ माधव बापट यांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, एन.सी.सी. विभागप्रमुख मेजर नम्रता माने, लेफ्टनंट मधुसूदन माने, एनएसएस विभागप्रमुख वरिष्ठ महाविद्यालय श्री. खांडेकर, विराज ओक कनिष्ठ महाविद्यालय एन.एस.एस. विभागप्रमुख पालशेतकर आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.













