राजापूर प्रतिनिधी : तालुक्यातील गोठणेदोनिवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी नेरकेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष कुडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल कुडकर यांचे अभिनंदन होत आहे.
गोठणे दोनिवडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी २२ ऑगस्ट रोजी झाली. या ग्रामसमेत गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी कुडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सरपंच मुकेश विचारे व मावळते तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश भोसले यांनी कुडकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा केल्या.
या प्रसंगी गावचे सरपंच मुकेश विचारे, उपसरपंच सुप्रिया हातणकर, ग्रामविकास अधिकारी दिपाली वडर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पवार, दर्शना लोळगे, पुनाजी पाजवे, नेरकेवाडीचे पोलीस पाटील सचिन मांडवकर, पोलीस पाटील श्रेया हातणकर, दिपक हातणकर, माजी सरपंच प्रभाकर हातणकर, संतोष निकम, शांताराम हातणकर, लुकाजी राघव व गोठणे दोनिवडे गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कुडकर हे गेली काही वर्षे गावच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात कार्यरत आहेत. गोठणेदोनिवडे ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. यावेळी उपस्थितांनी कुडकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.













