चिखली येथे दुचाकीचा अपघात दुचाकीस्वार जखमी

उपचारासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल

गुहागर प्रतिनिधी:
शृंगारतळी ते चिखली या महामार्गावर नुकताच दुचाकी स्वराचा अपघात झाला. दुचाकी स्वाराच्या अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. हा अपघात महामार्गावरून जाणाऱ्या एका गाईला दुचाकीचा धक्का लागून झाला. यात ही गाय ही जखमी झाली आहे. हा अपघात सायंकाळी 6:15 च्या दरम्यान झाल्याचे समजते. दुचाकीस्वार शृंगारतळी कडून चिखली कडे जात होते. हे दोन्हीही मुंढरगावचे रहिवासी असल्याची समजते. या दोघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले.