दोडामार्ग :प्रतिनिधी
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुबई संचलित
श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे (ता. दोडामार्ग) येथील ज्येष्ठ शिक्षिका सौ. पूर्वा संदिप गवस यांना शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान व उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल माजी शिक्षण मंत्री ना. दीपकभाई केसरकर मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त अत्यंत प्रतिष्ठेचा “गुरुसेवा गौरव पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे. या अद्भूत यशाबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.
सौ. पूर्वा गवस यांच्या या यशामुळे पिकुळे गाव आणि संपूर्ण परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्या या यशाचे औचित्य साधून प्रशालेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अशोक रामू आंबूलकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या उपस्थितीत सौ. गवस यांना शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्वांनीच त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस उदंड आयुष्याच्या व यशाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सौ. पूर्वा गवस मॅडम यांना पुरस्कार घोषित झाल्याचे समजताच पिकुळे पंचक्रोशीसह सर्व स्तरातून आणि शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.











