जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत बांदा खेमराज प्रशाला विजयी 

विभागीय स्पर्धेसाठी निवड 

बांदा : प्रतिनिधी

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित पणदूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा संघाने अंतिम विजेतेपद पटकविले. या संघाची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

 

विजेत्या संघात निधी सचिन सावंत(कर्णधार), आर्या अरविंद मांजरेकर, रोहिणी वसंत चव्हाण, सानवी शैलेश महाजन, संजना धन्नुकुमार मौर्या, श्रृती रविशंकर कुडव, शमिका दत्तात्रेय आईर, रिद्धी संतोष तावडे, श्रद्धा रविशंकर कुडव, शमिका अमोघ सिद्धये, मृण्मयी समीर कल्याणकर, पूर्वी प्रदीप भाईप,निधी सुनील राठोड, जुई संदीप सावंत, ऋतुजा दत्तगुरु वडर आणि सलीमुनिशा राजू खान यांचा समावेश होता.

 

विजेत्या संघांचे धी बांदा नवभारत शिक्षक प्रसारक मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, समन्वय समिती सचिव सौ. रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, मुख्याध्यापक प्रमोद सावंत यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या प्रसंगी उपप्राच्यार्या सौ. मिलन वसकर, क्रीडा शिक्षक सुनील परब, सौ. सुमेधा सावळ, पर्यवेक्षक रणसिंग सर, संघ प्रशिक्षक रोहित आईर, अनुप बांदेकर, सिद्धार्थ गाड याचे विशेष मार्गदर्शन लाभले.