निलेश जाधव / देवरूख:
👉 देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ आज दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास झाला भीषण अपघात
👉 या अपघातात दुचाकीवरील तरूण व तरूणी जखमी झाली असून त्यांना देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
👉 दुचाकीस्वार हा भरधाव वेगाने रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने जात होता असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले
👉 पाटगाव येथील गोपाळवाडीत जाण्यासाठी टेम्पो वळत असत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक बसली
👉 हा अपघात एवढा भीषण होता कि दुचाकीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे
👉 अपघाताची माहिती मिळताच देवरूखचे पोलीस हे. काँ. सचिन कामेरकर, पो. काँ. सचिन लगारे, महिला पो. हे. काँ. आर्या वेलवणकर व महिला पो. काँ. रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.












