गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये संस्कृत दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले.
संस्कृत विषय प्रमुख जगदीश जाधव यांनी मेहनत घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी मम माता देवता,मनसा सतत स्मरणीयम,महीषासूरमर्दींनी स्तोत्र,गणनायकाय गणदैवताय,अयम् गिरी नंदिनी,भारत भारत भवतु भारतम,सर सर आयान्ति हे जाखडी नृत्य सादर् केले.
देवस्थळी ट्रस्ट च्या भाषण स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले.यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
जगदीश जाधव यांनी संस्कृत दिन साजरा करण्यामागचे महत्व विषद केले.यावेळी मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे, संतोष कुलकर्णी,आदिंसह अन्य शिक्षक उपस्थित होते.











