निष्ठावान पत्रकार अन मठ गावचा समाजसेवक हरपल्याची खंत…

 

मठ येथील श्रद्धांजली सभेत मान्यवरांकडून आदरांजली

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील ३३ वर्षांच्या पत्रकारिकतेत कुणालाही कसल्या प्रकारे न दुखवता निष्कलंक पत्रकारीता करणारे ज्येष्ठ पत्रकार के. जी.गावडे यांनी राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, कला-सांस्कृतिक क्षेत्रात आपले संबंध चांगले ठेवले. त्यांच्या या कामाबरोबरच मठ गावाच्या विकास कामांत मी आणि माझी वाडी या पुरते ते सिमीत न रहाता गावातील कुठलेही विकास काम हे सर्व जनतेच्या सोयी सुविधेसाठी व्हावे यासाठी आमदार किंवा पालकमंत्री तसेच राजकिय पश्नांच्या पदाधिकारी यांच्या मागे लागून ते करून घेण्याची धडपड ते करीत असत त्यात त्यांचा स्वतःचा कोणताही स्वार्थ नव्हता. एवढेच नव्हे तर संत लालाजी मंडळाची स्थापना व लालाजी मंडळाकडे दिवाळीचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यमांचे आयोजन करीत असत. त्यातही सर्व राजकिय लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना निमंत्रीत करून कार्यक्रमाची यशस्वीता साधत त्यांच्या सर्वाशी प्रेमळ वागण्याच्या स्वभावामुळे ते एक समाजसेवक सुद्धा होते एका उत्कृष्ठ व ज्येष्ठ पत्रकारा बरोबरच मठ गावचा समाजसेवक हरपल्याची खंत उपस्थित मान्यवरांनी के. जी. गावडे यांच्या आयोजीत श्रद्धाजली सभेत व्यक्त केली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रातिक सदस्य एम. के. गावडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्लेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, अँड. एन. पी. मठकर, आरोलकर नर्सरीचे संचालक शिवराम आरोलकर, मठ येथील विकास संस्थेचे चेअरमन सुभाष बोवलेकर, पत्रकार संघाचे सल्लागार प्रदीप सावंत, माजी पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, पत्रकार अजित राऊळ, भरत सातोस्कर, संत लालाजी मंडळाचे सचिन आईर, सामाजिक कार्यकर्ते दादा गावडे, प्रकाश गावडे, दत्ता कोकरे, बबन परब, उमेश नाईक, सुधाकर नाईक, देऊ परब, एकनाथ भगत, रामकृष्ण गावडे, आदीसह मठ येथील ग्रामस्थ व के. जी. गावडे हितचिंतक उपस्थित होते.