गावखडी / वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील अंजनी निवासस्थानी रत्नागिरीचे प्रसिद्ध मूर्तिकार श्री.वामन विठ्ठल सुवरे यांनी अचानक भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.
रत्नागिरी जिल्ह्यात श्री वामन विठ्ठल सुवरे या मूर्तिकारांनी अतिशय उत्तमरीत्या उल्लेखनीय कार्य या गणेश मूर्ती साकारण्यात केलेले आहे अशा या प्रसिद्ध मूर्तिकार श्री वामन सुवरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष यांच्या हस्ते मेर्वी “अंजनी निवासस्थानी :भव्य सत्कार करण्यात आला
याप्रसंगी रुपेश पालेकर , शिक्षक श्री चंद्रशेखर पेटकर, सौ मैथिली चंद्रशेखर पेटकर, शुभम चंद्रशेखर पेटकर ,पत्रकार दिनेश पेटकर ,पिंट्या पेटकर आणि गणेशभक्त आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.












