माचाळ ग्रामस्थ विकास मंडळ, मुंबई (रजि) आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धा संपन्न

शंकर भिसे यांनी केलेल्या देखाव्याला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक

लांजा (प्रतिनिधी) मुंबईस्थित माचाळ ग्रामस्थ विकास मंडळाचे वतीने आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत
शंकर भिसे यांनी केलेल्या देखाव्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
स्पर्धेचे हे यशस्वी चौथे वर्ष असून गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात माचाळ गावात आलेले चाकरमानी आणि गावातील ग्रामस्थ यांनी ही स्पर्धा जिंकण्यासाठी अतोनात मेहनत देखावे बनवले. माचाळ गावातील प्रत्येक घराघरात स्पर्धेच्या निमित्ताने आकर्षक सजावट पाहायला मिळाली. सर्व मनमोहक देखावे पाहून परीक्षण करण्यात परिक्षकांची दमछाक झाली.
या स्पर्धेत शंकर सोना भिसे यांनी केलेल्या देखाव्याला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. आत्माराम सजणा पाटील आणि सीताराम पांडुरंग पाटील यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सागर पाटील, केशव भोसले आणि नथुराम धोंडू पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
माचाळ गावचे गावकर शिरीष पाटील, सोमा पां पाटील, नथुराम धोंडू भातडे, नथुराम गुणाजी भातडे आणि सजनू गोवळकर तसेच मंडळाचे सल्लागार सोमा अनाजी भातडे, विश्राम गोवळकर, दीपक राणे, गंगाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडून बक्षीस वितरण करण्यात आले.