▪️परब परिवाराच्या आदरातिथ्याने जिल्हाधिकारी भारावल्या
मसुरे | झुंजार पेडणेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे स्विय सहाय्यक राकेश प्रल्हाद परब यांच्या मालवण तालुक्यातील चूनवरे येथील निवासस्थानी विराजमान गणरायांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यानी गुरुवारी दर्शन घेतले. राकेश परब आणि परिवाराच्या आदरातिथ्याने जिल्हाधिकारी भारावून गेल्या व ग्रामीण भागातील गणेश चतुर्थी सणाच्या परंपरेबद्दल समाधान व्यक्त केले.
गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती घोडमिसे या प्रशासकीय कामासाठी पोईप येथे आल्या असताना स्विय सहाय्यक राकेश परब यांनी त्यांना आपल्या गणपती दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. विनंतीस मान देऊन जिल्हाधिकारी पोईप येथील काम आटोपून चूनवरे येथे रवाना झाल्या. त्यांच्या समवेत जिल्हा कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे , मंडळ अधिकारी संजीव गुरव व पोईप मंडळ सजातील सर्व तलाठी, महसूल सेवक, पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी गणरायाच्या दर्शनानंतर परब परिवाराच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिवाराच्या वतीने प्रल्हाद परब,नामदेव परब, सुहासिनी परब, संतोष परब, संदिप परब, अभिजित परब, सुवर्णा परब, दिपू परब, दिपक परब व राकेश परब परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.










