माखजन हायस्कूल मध्ये हिंदी पखवाडा साजरा.

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी पखवाडा विविध कार्यक्रमानी साजरा झाला.
हिंदी पखवाडा निमित्त प्रशालेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .भाषण स्पर्धेत ५ वी ते ७ वी गटात जान्हवी कातकर प्रथम,८ वी ते १० वी सिद्धी पांचाळ, कनिष्ठ महाविद्यालयीन गटात हर्ष चव्हाण प्रथम क्रमांक पटकावला.तर निबंध स्पर्धेत ५ ते ७ वी गटात काव्या करंजेकर प्रथम,८ ते १०वी गटात आराध्या सप्तीसकर ,कनिष्ठ महाविद्यालयीन गटात तन्वी साईल प्रथम क्रमांक पटकवला.
हिंदी पंखवाडा निमित्त प्रशालेत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली.हिंदी भाषेतून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी केले.यावेळी हिंदी पखवाडा साजरा करण्याचे महत्व विषद केले.मुख्याध्यापक महादेव परब यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमावेळी सूत्रसंचालन सिद्धी पांचाळ आणि आराध्या सप्तीसकर यांनी केले.नियोजन हर्षदा कदम यांनी तर आभार गणेश शिंदे यांनी मानले.