ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गवळीवाडी येथिल गोवा स्थित रहिवासी रामा गोविंद शृंगारे वय वय ६२ यांचे गोवा येथे झालेल्या एका अपघातात दुर्दैवी निधन झाले.पर्वरी येथे राहणारे रामा शृंगारे हे रविवारी रात्री जेवण झाल्यावर फिरायला बाहेर पडले होते. त्याचवेळी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर तसेच मेंदूला जबर मार बसला. अशा गंभीर अवस्थेत त्यांना बांबूळी येथे उपचारासाठी नेण्यात आले मात्र प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती अखेर उपचार सुरु असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.रामा शृंगारे हे गोवा येथील निवृत्त शासकीय कर्मचारी होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे गोवा तसेच ओटवणे येथे त्यांचा मोठा मित्र परिवार होता त्यामुळे त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अतिशय दुःखद वातावरणात ओटवणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पच्छात पत्नी तीन मुली, पत्नी भाऊ,भावजय,जावई पुतण्या असा मोठा परिवार आहे.ओटवणे येथील गोविंद शृंगारे यांचे ते भाऊ होत.












