गुरुकुल पूरक उपक्रम
गौरव पोंक्षे माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन येथे गुरुकुल पूरक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी बाप्पा साकारले.
गुरुकुल पूरक उपक्रम प्रमुख संतोष कुलकर्णी व ओंकार नामजोशी यांनी विशेष मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रशालेत गुरुकुल पूरक उपक्रमांतर्गत विविध कृती करून घेतल्या जातात.
मातीला आकार देत बाप्पा साकार झाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.यावेळी संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर,सहसचिव दीपक शिगवण,माजी विद्यार्थी प्रकाश कवळकर यांनी विद्यार्थ्यांचे व उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे उपस्थित होते.












