ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे करमळगाळू रस्त्यावर सातत्याने दृष्टीस पडणाऱ्या ८ ते ९ फूट अजस्त्र अजगराला अखेर विनायक वर्णेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय शीथाफिने पकडून त्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
ओटवणे करमळ गाळूवाडी नजीक जंगल परिसर असल्याने या भागात जंगली जनावरांबरोबर सरपटणाऱ्या जनावरांची त्यातच अजगरांची संख्या मोठी आहे.नजीक असणाऱ्या कालव्यातूनही रात्रीच्या वेळी हे सरपटणारे साप बाहेर पडतात.आणि जवळच असणाऱ्या लोक वस्तीत शिरतात त्यामुळे पाळीव प्राण्याबरोबर लोकांच्या ही जीवितास धोका निर्माण होत आहे.
रात्री अजगर ग्रामस्थांच्या दृष्टीस पडताच त्यांनी विनायक वर्णेकर या युवकाला बोलवीले. विनायक वर्णेकर याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा अजगर पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधीवासात सोडले. यावेळी त्याच्या सोबत ओंकार परब, विनित रासम त्यांच्या सोबत उपस्थित होते.













