सेवा संकल्प अभियान–सेवा मेरा योगदान’ उपक्रमांतर्गत आयोजन
रक्तदात्यांना हेल्मेट भेट
चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी चिपळूण ग्रामीण मंडलाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान–सेवा मेरा योगदान’ या उपक्रमांतर्गत रविवारी, दि. ४ ऑक्टोबर रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभागृह, प्रांत कार्यालयाशेजारी, चिपळूण येथे सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे.
या शिबिरात चिपळूण ग्रामीण परिसरातील नागरिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘रक्तात आहे… राष्ट्रभक्ती!’ या संदेशातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून, रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी दिलेले अमूल्य योगदान असल्याचे आयोजकांनी सांगितले. युवकांसह सर्व पात्र रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू म्हणून हेल्मेट देण्यात येणार आहे. रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. या महारक्तदान शिबिराचे आयोजन भाजपा चिपळूण ग्रामीण मंडल यांच्या वतीने करण्यात आले असून, विनोद भरण, सदस्य खेर्डी पंचायत समिती गण तथा तालुकाध्यक्ष, भाजपा चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात येत आहे. रक्तदान शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी दिपक शिंदे (९२०९९ ४४९३८), ऋषिकेश कदम (८८८८५१६९५०), महेश शिंदे (९१३०३ ६१७७७) आणि संकेत चिले (७९७२८८४३८८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चिपळूण ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान करून ‘सेवा मेरा योगदान’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












