मसुरे | झुंजार पेडणेकर : पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करणे यासाठी वनराई बंधारे बांधणे ही काळाची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्याचा साठा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन किशोर कदम यांनी केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर १ व शाळा ओसरगाव बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमात राजेश कदम, प्रदीप कदम, रुपेश तांबे, अशोक तांबे, नयन आलव, स्वप्नाली तांबे, रसिका तांबे, स्नेहल येरळकर, अंकिता येरळकर, सुप्रिया आलव, मुख्याध्यापक शीतल दळवी, किशोर कदम, राजश्री तांबे तसेच सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक शीतल दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजश्री तांबे यांनी केले.
या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.













